नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या तत्कालीन सोव्हियत महासंघ तथा रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष स्टॅलीन यांनी केली होती, असे वक्तव्य करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळ उडवली आहे. स्वामी यांच्या या जाहीर वक्तव्यामुळे एक नवा वाद व चर्चा होण्याची शक्यता आहे. नेताजींचा मृत्यू १९४५ साली विमान अपघातात झाला नव्हता, तर त्यांची स्टॅलीन यांनी हत्या केली होती असा दावा स्वामी यांनी केला. नेताजींना अटक करवून त्यांना सायबेरियातील तुरुंगात टाकले आणि १९५३ साली त्यांना फाशी दिली असा आरोपही त्यांनी केला. सायबेरियातील याकुत्सक तुरुंगात असण्याची माहिती तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांना होती, असा दावाही त्यांनी केला आहे.