नीरवच्या मालमत्तेचा सप्टेंबरात लिलाव

0
14

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेचा २३ सप्टेंबरला लिलाव करण्याचे आदेश कर्जवसुली लवादाने (डीआरटी-आय) दिले आहेत. मोदीकडून पैसे वसूल करण्यासाठी एचसीएल हाऊसचा लिलाव केला जाणार असून, या एचसीएल हाऊसची किंमत २,१३३ कोटींपेक्षा जास्त आहे. मुंबई डीआरटी-आयने दिलेल्या आदेशानुसार, मरोल येथील एचसीएल हाऊसचा लिलाव २३ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. किमान ५२ कोटींपासून पुढे याचा लिलाव सुरू होणार आहे.