सत्तरीतील न्यू मोर्ले कॉलनीतील दोघा बहिणींनी आमोणा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पैकी बेपत्ता नीता विठ्ठल गावस हिचा मृतदेह काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिळगांव येथे नदीत आढळला. दरम्यान, फोंडा पोलिसांनी काल नीताचा भाऊ रामचंद्र गावस याला अटक केली.
डिचोली पोलिसांना सदर मृतदेह तरंगताना आढळल्याचे समजताच उपनिरीक्षक तुकाराम वाळके घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी दुसरी बहीण सुजाता गावस हिला वाचवण्यात रेती कामगारांना यश आले होते. आता हे प्रकरण वाळपई पोलिसांकडे सुपूर्द केले जाणार आहे. भावाने मारल्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सुजाताने सांगितले होते.