नीट पेपर फुटीप्रकरणी बिहारमधून एकास अटक

0
4

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभर वाद निर्माण झाला आहे. नीट परीक्षेमधील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या परीक्षेतील गोंधळानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत बिहारच्या पाटणामधून गुरुवारी दोघांना अटक केली.

नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणात पाटणामधून सीबीआयने मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने मनीष प्रकाशला अटक केली. तसेच या अटकेबाबत मनीष प्रकाशच्या पत्नीला माहिती देण्यात आली. नीट पेपरफुटीच्या प्रकरणात मनीष प्रकाशची महत्वाची भूमिका असल्याचा संशय सीबीआयला आहे. याचे कारण मनीष प्रकाशने पाटणा येथे 4 मे रोजी म्हणजे परीक्षेच्या एक दिवस आधी एका स्कूलशी संबधित वसतिगृहात काही विद्यार्थ्यांना बसवले होते.

मनीष प्रकाशने आशुतोष कुमारच्या विनंतीवरून ही व्यवस्था केल्याचा आरोप आहे. त्याच ठिकाणी काही विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचे लीक झालेले पेपर आणि उत्तर पत्रिका देण्यात आल्याचा संशय आहे.