‘नीट’च्या विदेशी परीक्षार्थींना खास विमानाने आणा ः न्यायालय

0
127

‘नीट’ या वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेस बसू इच्छिणार्‍या विदेशातील परीक्षार्थींना ‘वंदे भारत’ मोहिमेखालील खास विमानांतून भारतात आणावे अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्र सरकारला केली. पुढच्या वर्षापासून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने ही परीक्षा ऑनलाइन स्वरुपात घ्यावी अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. जेईई परीक्षा जर ऑनलाइन घेता येत असेल तर नीट सुद्धा ऑनलाइन घेतली गेली पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.