निसटत्या पराभवानंतरही न्यूझीलंड अंतिम फेरीत

0
92

थरारक लढतीत न्यूझीलंडवर २ धावांनी विजय मिळवूनही इंग्लंडला तिरंगी मालिकेतून काल रविवारी बाहेरचा रस्ता धरावा लागला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पक्की करण्यासाठी इंग्लंडला किमान २० धावांनी विजय गरजेचा होता. सरस निव्वळ धावगतीच्या बळावर किवी संघाने ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश मिळविला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना इंग्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. इंग्लंडने १९४ धावा फलकावर लगावल्यानंतर न्यूझीलंडला १९२ धावांपर्यंतच पोहोचता आले.

इंग्लंडने मॉर्गनच्या ४६ चेंडूंतील तडाखेबंद ८० धावांच्या बळावर आव्हानात्मक धावसंख्या रचली. धावांचा पाठलाग करताना मन्रो व गप्टिल यांनी स्फोटक फलंदाजीचे दर्शन घडवले. विशेषतः मन्रोने डेव्हिड विली व करनवर तुटून पडताना पॉवरप्लेचा पुरेपूर लाभ उठवला. टॉम करनने टाकलेल्या अंतिम षटकांत १२ धावा हव्या असताना न्यूझीलंडला विजयाला गवसणी घालता आली नाही. बुधवार २१ रोजी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.

धावफलक
इंग्लंड ः जेसन रॉय झे. विल्यमसन गो. बोल्ट २१, आलेक्स हेल्स झे. विल्यमसन गो. साऊथी १, डेव्हिड मलान झे. चॅपमन गो. ग्रँडहोम ५३, ऑईन मॉर्गन नाबाद ८०, जोस बटलर यष्टिचीत सायफर्ट गो. सोधी २, सॅम बिलिंग्स त्रि. गो. बोल्ट ६, डेव्हिड विली झे. गप्टिल गो. साऊथी १०, लियाम डॉसन झे. गप्टिल गो. बोल्ट १०, ख्रिस जॉर्डन नाबाद ६, अवांतर ५, एकूण २० षटकांत ७ बाद १९४
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-५०-३, मिचेल सेंटनर २-०-३२-०, टिम साऊथी ४-०-२२-२, कॉलिन डी ग्रँडहोम ४-०-३२-१, केन विल्यमसन १-०-१६-०, ईश सोधी ४-०-३१-१, कॉलिन मन्रो १-०-११-०
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल त्रि. गो. मलान ६२, कॉलिन मन्रो झे. विली गो. रशीद ५७, केन विल्यमसन त्रि. गो. डॉसन ८, मार्क चॅपमन नाबाद ३७, रॉस टेलर झे. मॉर्गन गो. करन ७, कॉलिन डी ग्रँडहोम नाबाद ७, अवांतर १४, एकूण २० षटकांत ४ बाद १९२
गोलंदाजी ः डेव्हिड विली ३-०-३३-०, टॉम करन ३-०-३२-१, ख्रिस जॉर्डन ४-०-४१-०, आदिल रशीद ४-०-२२-१, लियाम डॉसन ४-०-२७-१, डेव्हिड मलान २-०-२७-१