जम्मू-काश्मीर पोलीस खात्यातील एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची रविवारी बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. सदर अधिकारी एका मशिदीत नमाज अदा करत होते, तेव्हाच त्यांच्यावर हल्ला झाला. मोहम्मद शफी मीर हे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) शहरातील गंतमुल्ला बाला भागातील स्थानिक मशिदीमध्ये प्रार्थना करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे, असे काश्मीर पोलिसांनी सांगितले.