निवडणूक प्रचारावर कोरोनामुळे असलेले सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने निवडणूक आयोगाकडून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राजकीय सभांसाठी ५० टक्के उपस्थितीची मर्यादा हटवण्यात आली आहे. तसेच रोड शो ला देखील आता परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा कहर सुरू असताना पाच राज्यांतील निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती, तसेच प्रचारावर देखील निर्बंध लादले होते. उत्तरप्रदेशात काहीत टप्प्यांचे मतदान बाकी आहे, तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या ठिकाणच्या उमेदवारांना आता प्रचारासाठी मोकळीक मिळणार आहे.