निवडणूकपूर्व आघाडीबाबत अद्याप निर्णय नाही : डिसोझा

0
9

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष यांच्यात निवडणूकपूर्व आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. तथापि, निवडणूक आघाडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची क्षमता आहे; परंतु धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून निवडणूक आघाडीसाठी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आघाडीबाबत लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांमध्ये निवडणूक आघाडीबाबत निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीबाबत योग्य निर्णय घेणार आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले.