गुजरातेत कच्छ जिल्हातील नलिया गावात १ नोव्हेंबरला दाखल होण्याची संभावना असलेल्या ‘निलोफर’ चक्रीवादळाशी सामना करण्याकरिता तटरक्षक दल तयारीला लागला आहे. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी तटरक्षक दलाने ३० नौका तसेच विमाने व हेलिकॉप्टर्स तैनात करून ठेवलीआहेत. ७० टक्के मच्छीमारी बोटी किनार्यावर पोचल्या असून उर्वरित ३० टक्के वादळापूर्वी किनार्यावर पोचतील असे अधिकार्याने सांगितले. दरम्यान, गुजरातेत थडकण्यापूर्वी वादळाची तीव्रता काहीशी कमी होईल, अशी अपेक्षा वेधशाळेने व्यक्त केली आहे.