निलंबित दोघाही महिला पोलिसांना जामीन मंजूर

0
24

पोलीस शिपाई प्रथमेश गावडे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि निलंबित महिला पोलीस शिपाई प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण या दोघांना येथील उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सशर्त जामीन काल मंजूर केला. त्यांची 20 हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि एका हमीदारावर जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला न्यायालयाने आहे.

या प्रकरणात पोलीस शिपाई प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण यांना 4 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला होता. त्याच दिवशी कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना दोघींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.