पंतप्रधानांचे आवाहन
नियोजन आयोगाची रचना संपुष्टात आणून नवीन संस्थेची निर्मिती करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती. त्याचाच भाग म्हणून नव्या संस्थेविषयी जनतेकडे काय कल्पना आहेत, त्या तपशिलवार पाठवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. केंद्र सरकारच्या ाूर्सेीं.पळल.ळप या संकेतस्थळावर आपली मते पाठवायची आहेत. ‘‘आमची कल्पना आहे की, या आयोगाच्या जागी एक अशी संस्था असावी, जी २१ व्या शतकातील भारताच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल आणि राज्यांचा सहभाग अधिक मजबूत करेल.’’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.