नियमित वीज बिलांसाठी २०० मीटर रीडर्सची भरती

0
93

वीज खात्याने लवकरच २०० मीटर रिडर्सची भरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविले आहे. सदर मीटर रिडरांची पदे भरल्यानंतर ग्राहकांना नियमित बिले देणे शक्य होईल, असे खात्याचे जनसंपर्क अधिकारी वर्गीस यांनी सांगितले. खात्याच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मान्सूनच्या सुरुवातीस वीज पुरवठा खंडित होत होती. दरम्यानच्या काळात काही महत्वाची कामे केल्याने सध्या पुरवठा सुरळीत होत आहे, असे ते म्हणाले.