निधी वाटपाचा वाद अखेर शमला

0
7

विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी काल सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांची एकत्र बैठक घेऊन कला व संस्कृती खात्याच्या निधी वाटपाच्या विषयावर तोडगा काढला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तवडकर यांनी गावडेंवर निधी वाटपात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. दरम्यान, राज्यात कला व संस्कृती खात्याच्या निधी वितरणातून झालेले आरोप-प्रत्यारोप चर्चेचा विषय बनले होते. त्यामुळे विरोधी आमदार विजय सरदेसाई व इतरांनी निधी वाटप प्रश्नी चर्चेची मागणी केली होती. विधानसभेत सभापती रमेश तवडकर यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांची कला व संस्कृती खात्याच्या निधी वितरण प्रकरणी चौकशीची मागणी फेटाळून लागली.