नितीशकुमार रालोआसोबत जाणार?

0
3

>> इंडिया आघाडीची साथ सोडण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया आघाडीला धक्के बसू लागले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचा दावा केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नितीश कुमार पुन्हा भाजप प्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’बरोबर जाण्याची शक्यता आहे. याला भाजपाकडून मंजुरीही मिळाली असून बिहारची विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलावून घेतले आहे.

दरम्यान, नितीश कुमारांना थांबवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी पाऊल उचलले आहे. लालूप्रसाद यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. तर, काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही नितीश कुमार यांच्या संपर्कात आहेत.
नितीश कुमार यांनी बुधवारी घराणेशाहीवरून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करताना घराणेशाहीवर वक्तव्य केले होते. त्यानंतर बिहारमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला.