नितीशकुमारांचा भाजपशी हातमिळवणीचा निर्णय दुर्दैवी

0
114

>> निर्णयाशी सहमत नाही ः शरद यादव

बिहारमधील महागठबंधनातून बाहेर पडण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयावर गेले काही दिवस जाहीर वक्तव्य करण्याचे टाळलेल्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) ज्येष्ठ नेते खासदार शरद यादव यांनी अखेर काल त्या विषयावरील मौन सोडले. काल संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी नितीशकुमार यांनी भाजपशी हात मिळवणी करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून त्यमुळे जनादेशाचा अनादर झाल्याची स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली.
नितीशकुमार यांनी घेतलेल्या निर्णयाशी आपण सहमत नाही. बिहारमधील मतदारांनी आम्हाला असे करण्यासाठी सत्ता दिली नव्हती असे यादव यावेळी म्हणाले. नितीशकुमार यांनी राजद व कॉंग्रेसबरोबरीत महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व भाजपशी संधान बांधून पुन्हा मुख्यमंत्रिपदी नुकतेच आरूढ झाले. यामुळे जेडीयूचे अन्य एक ज्येष्ठ खासदार अन्वर अली यांनीही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
पक्षाचे ११ यादव व ७ मुस्लीम आमदारांकडून या निर्णयाविरोधातील सूर बाहेर पडत असल्याची चर्चा होती. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनलेल्या नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यालाही शरद यादव उपस्थित राहीले नव्हते.