निठारी हत्याकांड प्रकरणी कोळीला आणखी एक मृत्यूदंड

0
100

डिसेंबर २००६ मध्ये गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोळी याला गाझियाबाद सत्र न्यायालयाने मृत्यूदंड सुनावला. १४ वर्षीय रिंपा हलधर हिच्या क्रूर हत्येत तो आरोपी होता. निठारी भागातील मुलांचे निघृण खून करून तो घरगडी असलेल्या बंगल्याशेजारच्या नाल्यात तुकडे करून फेकायचा. या नाल्यातून अनेक सांगाडे सापडले होते. दरम्यान, याआधी अन्य खून प्रकरणात त्याला ४ फाशीच्या सजा सुनावण्यात आल्या असून अजून ११ खून प्रकरणे त्याच्याविरुद्ध प्रलंबित आहेत. दरम्यान, १२ रोजी त्याला फाशी देण्याची तयारी केली असल्याचे कळते. जुलैमध्ये कोळीची दयायाचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. एकुण १६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध नोंदवण्यात आली होती. रिंपा हलधर प्रकरणात त्याचा घरमालक मोनिंदर सिंग पंधेर यालाही फाशी झाली होती, त्याला नंतर अलाहाबाद हायकोर्टाने मुक्त केले होते.