निठारी हत्याकांड :  कोळीच्या फाशीस स्थगिती

0
100

निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोळी याच्या फाशीच्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने काल आठवडाभराच्या काळासाठी स्थगिती दिली. िंनयुक्त मुख्य न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. अनिल दवे यांनी आदेशाद्वारे कोळीच्या आव्हान अर्जानंतर ही स्थगिती दिली. कोळी याला १२ सप्टेंबर रोजी फाशी देण्याचे ठरले होते. उत्तर प्रदेशच्या निठारी भागात मुलांचे खून करून नाल्यात फेकण्याच्या गाजलेल्या प्रकरणात घरगडी म्हणून काम करणारा कोळी प्रमुख दोषी आहे.