वजन आणि माप खात्याच्या अधिकार्यांनी काल पणजीतील तीन हेल्मेट विक्री दुकानांवर छापे मारून ४० हेल्मेट्स जप्त केली. जप्त करण्यात आलेली एकूण हेल्मेट्स ५० हजार रु. एवढ्या किमतीची असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेल्मेट्स निकृष्ट दर्जाची असल्याने ती जप्त करण्यात आली असल्याचे वजन आणि माप खात्यातील सूत्रांनी सांगितले.
येत्या २ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व रस्त्यांवर दुचाकीचालकांसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात हेल्मेट्ससाठीची मागणी वाढणार असल्याने हेल्मेट विक्रेत्यांनी जास्त नफा कमावण्यासाठी निकृष्ट दर्जाची हेल्मेट्स अव्वाच्या सव्वा किमतीत विकण्यासाठी आणली असल्याची माहिती वजन आणि माप खात्याला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर काल हे छापे टाकण्यात आले होते.