नाल्यात बुडून मुलाचा मृत्यू

0
15

उसगाव परिसरात घराजवळ असलेल्या नाल्यात बुडून 2 वर्षीय मुलाचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या मुलाचे आई-वडील हे झारखंड येथील असून, ते या परिसरातील एका कुळागरात कामाला आहेत. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, उसगाव येथे एका भाड्याच्या खोलीत एक दांपत्य राहत होते. आई फोनवर बोलत असताना दोन वर्षांचा मुलगा गुरुवारी रात्री घरालगत असलेल्या नाल्याजवळ गेला. मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेल्या नाल्यात सदर मुलगा पडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील मंडळींनी नाल्याजवळ धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांनी मुलाला नाल्यातून बाहेर काढत भीर अवस्थेत 108 रुग्णवाहिकेतून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; पण तेथील डॉक्टरांनी तपासणी त्याला मृत घोषित केले. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पंचनामा करण्यात आला.