नायलॉन, प्लास्टिक किंवा चायनीज धागा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धाग्यासह इतर कोणत्याही कृत्रिम पदार्थापासून बनवलेल्या पतंगाच्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठवणूक, पुरवठा, आयात आणि वापर यावर राज्य सरकारने पूर्ण बंदी घातली आहे. राज्यात पतंग उडवण्याची परवानगी साध्या सुती धाग्यानेच देण्यात आली आहे. पतंग उडवताना काच, धातू किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंनी तयार केलेल्या धारदार धाग्याचा वापर केल्यामुळे मानव आणि प्राणी, विशेषत: पक्ष्यांना गंभीर दुखापत होत असल्याचे या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.