नाफ्तावाहू जहाज बाहेर काढण्यास यश

0
219

दोनापावल मार्वेळ येथे दीड महिन्यापूर्वी खडकात रुतलेले नलिनी हे नाफ्तावाहू जहाज बाहेर काढण्यात अखेर काल यश प्राप्त झाले. ते जहाज मुरगाव एमपीटीमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
दोनापावल येथे समुद्रात रुतलेले जहाज गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय बनून राहिले होते. अरबी समुद्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या चक्रीवादळामुळे मुरगाव बंदरात ठेवलेले नलिनी हे जहाज दि. २४ ऑक्टोबर रोजी भरकटत येऊन दोनापावल येथील किनार्‍यावर रुतून बसले होते. हे जहाज बाहेर काढण्यासाठी नेदरलँड येथील मास्टर मरिना या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने मागील सहा सात दिवसांपासून ते जहाज बाहेर काढण्यासाठी टग जहाजाचा वापर सुरू केला होता. टग जहाजाच्या साहाय्याने रुतलेले जहाज पुन्हा तरंगवण्यात यश प्राप्त झाले असून ते जहाज आता एमपीटीमध्ये नेऊन त्यातील नाफ्ता पाहेर काढण्यात येणार आहे