नादोड्यातील विवाहितेची नदीत उडी घेऊन आत्महत्या

0
98

वाडी-नादोडा येथील शांती शिवानंद गावस या ३८ वर्षीय महिलेचा मृतदेह काल (दि. २२) सकाळी १०.३० वाजता नादोडा येथील नदीजवळ गणपती विसर्जन करण्याच्या ठिकाणी पाण्यावर तरंगताना आढळला. शांती गावस मंगळवार पासून बेपत्ता असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात पती शिवानंद गावस यांनी दिली होती. रात्री ८ वाजेपर्यंत पत्नी घरी आली नसल्याने तिच्या पतीने म्हापसा पोलिसात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर करीत आहेत.