नाताळ सण व नववर्षानिमित्त गोव्यात मोठ्या संख्येने जे पर्यटक व अन्य लोक येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस सज्ज असून, सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यास गोवा पोलीस सक्षम आहेत, असे काल राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.
नाताळ व नववर्षाच्या काळात ज्या ज्या ठिकाणी गर्दी असेल, त्या त्या ठिकाणी जास्त पोलीस फौजफाटा ठेवण्यास येणार असल्याची माहिती महासंचालकांनी दिली. वरील काळात रात्रीची गस्तही वाढवण्यात येईल. दरवर्षी डिसेंबर महिन्यात नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यटकांचा ओघ कधी नव्हे एवढा वाढत असतो.