जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. आगामी नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित केल्या आहेत. तसेच रुग्णालयांत कर्मचारी, खाटा, औषधसाठा व अन्य सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची खातरजमा करा, असेही सूचित केले आहे.