नाताळादिवशी ‘सुशासन दिन’ साजरा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेमुळे गोवा सरकारसमोर पेच निर्माण झाला असून या विषयावर मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांनी अद्याप कोणताही आदेश दिलेला नाही, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.नाताळ हा सुटीचा दिवस असल्याने गोव्यात ख्रिस्ती बांधवांबरोबरच हिंदु लोकही या सणाचा आनंद लुटतात. त्यामुळे दि. २५ डिसेंबरला सुटीच असली पाहिजे, असे आपले स्पष्ट मत असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. आतापर्यंत केंद्र सरकारच्या प्रत्येक आदेशाचे राज्य सरकारने पालन केले आहे.