नाताळची सुटी रद्द करण्याचा प्रस्ताव नाही

0
88

ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे येत्या २५ डिसेंबर रोजी अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्याने नाताळची सुटी सरकार रद्द करू पाहात असल्याचा आरोप काल विरोधकांनी संसदेत केला. दरम्यान, सदर उपक्रमातील सहभाग ऐच्छिक असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे. नवोदय विद्यालय समितीने एक परिपत्रक जारी करून वाजपेयींचा जन्मदिन सर्व शाळांतून साजरा करावा असे नमूद केले होते. मात्र, त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सांगण्यात आलेले नाही. केवळ निबंध स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन केले जाईल व त्यातील सहभाग ऐच्छिक असेल असे स्पष्ट केले.