नाणूस-उसगाव नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

0
15

नाणूस-उसगाव येथील नदीत एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना बुधवारी संध्याकाळी घडली. प्रथमेश चंद्रशेखर गावडे असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश संध्याकाळी चारच्या सुमारास आपल्या काही मित्रांसमवेत पोहण्यासाठी नाणूस येथील या नदीवर गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. फोंडा पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रथमेशचा मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव इस्पितळात पाठवण्यात आला आहे. प्रथमेश याच्या पश्‍चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.