‘नाचूंया कुंपासार’ चित्रपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार

0
113

बहुचर्चित ‘नाचूंया कुंपासार’ या कोंकणी चित्रपटाला तिबुरोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट संगीत चित्रपट हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक बाड्रॉय बार्रेटो यांनी ही माहिती दिली. १५ एप्रिल रोजी हे पुरस्कार जाहीर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. गायिका लॉर्ना व संगीतकार ख्रिस पॅरी यांच्या प्रेमकहाणीवर आधारीत असलेल्या या चित्रपटाला यापुर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शिवाय ऑस्कर पुरस्कारासाठीही या चित्रपटाला नामांकन प्राप्त झाले होते.