नागेश करमली अनंतात विलीन

0
22

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कवी, साहित्यिक नागेश करमली यांच्या पार्थिवावर काल सांतईनेज-पणजी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र रामदास करमली यांनी चितेला अग्नी दिला. यावेळी सभापती रमेश तवडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नागेश करमली यांचे गुरुवारी पाटो-रायबंदर येथील निवासस्थानी निधन झाले होते. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी नागेश करमली यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी त्यांच्या रायबंदर येथील निवासस्थानी भेट देऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. गुरुवारपासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी तेथूनच अंत्ययात्रा काढण्यात आली. सांतईनेज येथील स्मशानभूमीत राजकीय, सामाजिक, व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांना अखेरचा निरोप दिला.