राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सातही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये निवडून आलेल्या 7 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाची ताकद आणखीच वाढली आहे. नागालँडची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले होते. निवडून आलेल्या या सर्व आमदारांनी एका पत्रकाद्वारे आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.