नागरी सेवेती अधिकार्‍यांच्या बदल्या

0
40

गोवा नागरी सेवेतील काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश काल जारी करण्यात आला. विकास गावणेकर यांची वित्त खात्याच्या अतिरिक्त सचिवपदी, तर सुनील मसुरकर यांची आरोग्य खात्याच्या अतिरिक्त सचिवपदी बदली करण्यात आली. आग्नेल फर्नांडिस यांची मडगाव रवींद्र भवनच्या सदस्य सचिवपदी, संध्या कामत यांची गृहनिर्माण खात्याच्या अतिरिक्त सचिवपदी, तर देविदास गावकर यांची गोवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.