राज्य सरकारने गोवा नागरी सेवेतील 9 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काल जारी केला. समाज कल्याण खात्याच्या संचालकपदी अजित पंचवाडकर, मत्स्योद्योग खात्याच्या संचालकपदी दीपेश प्रियोळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
जयंत तारी यांची मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारीपदी, तर गौरीश शंखवाळकर यांची मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरिता गाडगीळ यांची मुद्रण आणि छपाई विभागाच्या संचालकपदी, मॅन्युएल बार्रेटो यांची सहकारी संस्थांच्या निबंधकपदी, विशांत नाईक गावणेकर यांची अतिरिक्त वाणिज्य कर आयुक्तपदी, संजीव गावस देसाई यांची राज्यपालांचे सहसचिव, संध्या कामत यांची गोवा राज्य अल्पसंख्याक वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, पुंडलिक खोर्जुवेकर यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी 3, तसेच, त्यांच्याकडे उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी 1 चा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. डॉ. गीता नागवेकर यांची गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडे गोवा फुटबॉल विकास महामंडळाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.