मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची प्रतिक्रिया
कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्यातील कोरोना फ्रंट लाइन वॉरियर्सनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्यातून गोवा राज्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश होण्यास मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाई अशीच यापुढे कायम ठेवण्याची गरज आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर्स, मास्क वापर करण्याची गरज आहे. नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आनंदाची गोष्ट ः राणे
केंद्र सरकारने गोव्याचा ग्रीन झोनमध्ये केलेला समावेश ही आनंदाची गोष्ट आहे. आरोग्य खात्याने कोरोना विषाणूच्या विरोधात चांगले कार्य केल्याचे फळ मिळाले आहे. यापुढेही कोरोना विषाणूपासून गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून ग्रीन झोनमध्ये कुठले व्यवहार सुरू केले जाऊ शकतात याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. या सूचनांना अनुसरून पुढील वाटचाल केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.