नसबंदी शस्त्रक्रिया : चौकशीचे आदेश

0
72

छत्तिसगढ राज्यात बिलासपूर येथे नसबंदी शस्त्रक्रियांसाठीच्या सरकारी शिबिरात १३ महिलांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश काल मुख्यमंत्री रमण सिंग यांनी दिले. या शिबिरात एकुण ८३ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया करणार्‍या सर्जनला काल अटक करण्यात आली. शिवाय शिबिरात निकृष्ट दर्जाची औषधे पुरविलेल्या कंपनीलाही टाळे ठोकण्यात आले आहे. न्यायालयीन चौकशीत दोषी सापडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.