दारूच्या नशेत वाहन चालवणार्या तिघांना वाहतूक पोलिसांनी अडविताच पोलिसांना शिवीगाळ व मारहाण करणार्या रोझारिया फर्नांडिस याला न्यायालयाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठविले तर स्टीव शाणू शिरोडकर व दामोदर नाईक याची जामिनावर सुटका केली. दारूच्या नशेत वाहन चालविणार्या चालकांविरोधात मडगाव वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली असून नावेली उड्डाण पुलाच्या मडगावच्या बाजूने दोन स्कूटर स्वार दारूच्या नशेत भरवेगाने जात असता वाहतूक पोलिसांनी अडविताच पोलिसांना अर्वाच्च शिव्या दिल्या व ढकलून टाकले, हुज्जत घातली. लगेच इतर पोलिसांच्या मदतीने स्टीव शाणू शिरोडकर (१४) आकें बाईश, दामोदर दुर्गाराम नाईक (२९) चिंचाळ-मडगाव व रोझारियो फर्नांडिस (२५) शिरवडे या तिघांना अटक केली. ते तिघेही दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. कामात अडथळा आणला, शिवीगाळ केली व मारहाण केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध नोंद केला आहे.