आवश्यक तेवढा वेळ नसल्यामुळे मार्च महिन्यात सत्तेवर येणारे नवे सरकार नवा अर्थसंकल्प विधानसभेत मांडू शकणार नाही. त्यामुळे अर्थ खात्याने गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही विधानसभेत २०२२-२३ या वर्षासाठी लेखानुदान मांडण्याचा विचार चालवला आहे. त्यासाठीचे काम सुरू केले असल्याचे वृत्त आहे. मार्च महिन्यात सत्तेवर येणारे नवे सरकार हे लेखानुदान विधासभेत मांडेल. पुढील महिन्यात सत्तेवर येणार्या सरकारला पूर्ण क्षमतेचे अंदाजपत्रक तयार करून ते विधानसभेत मांडण्यास वेळ मिळणार नसल्याने विधानसभेत लेखानुदान मांडून ते संमत करून घेण्यात येणार आहे. हे लेखानुदान चार किंवा पाच महिन्यांसाठीचे असेल. तर नंतर पावसाळी अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात येणार आहे असे अर्थखात्यातील सूत्रांनी काल स्पष्ट केले.
गेल्या मार्च महिन्यातही सरकारने विधानसभेत पूर्ण क्षमतेने अंदाजपत्रक न मांडता सहा नह्यानसाठीचे लेखानुदान विधानसभेत मांडले होते.