नव्या मांडवी पुलाचे काम 10 वीच्या परीक्षेनंतरच

0
1

राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्यामुळे सरकारने राजधानी पणजीतील नव्या मांडवी पुलाच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर ढकलले आहे. दहावीची परीक्षा संपल्यानंतर गोव्यातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असलेला नवा मांडवी पूल दुरुस्तीच्या कामासाठी 18 मार्चपासून चार ते पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जुन्या मांडवी पुलाचे काम पूण4 होऊन तो पूल वाहतुकीस सुरू केल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा नवा पूल दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार होता. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने ही तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परीक्षेच्या काळात वाहतूककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला. दुरुस्तीच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.