गोवा प्रदेेश कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया कॉंग्रेस श्रेष्ठींतर्फे सुरू झाली असून आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी त्याविषयी औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांना या पदावरून हटविण्याविषयीच्या कागदपत्रांवर सही केली होती.
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने फर्नांडिस यांना बडतर्फ केल्याचा इन्कार करणारा मजकूर वृत्तपत्रांना पाठविला असला तरी राज्य तसेच अखिल भारतीय कॉंग्रेसच्या नेत्यांनी फर्नांडिस यांची पक्षाध्यपदावरून उचलबांगडी करण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिली आहे याला दुजोरा दिला. पक्षाच्या अनेक नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.