राज्यात नवीन तीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीला कालपासून प्रारंभ करण्यात आला असून, पणजी पोलीस स्थानकात नवीन कायद्याच्या आधारे पहिल्या गुन्हा नोंद करण्यात आला.
राज्यात नवीन तीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व इतरांची उपस्थिती होती. पणजी पोलीस स्टेशनवर नवीन फौजदारी कायद्यानुसार पहिली तक्रार रस्त्याच्या बाजूला शहाळ्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरोधात नोंद करण्यात आली. कांपाल येथे आयनॉक्सजवळील रस्त्याच्या बाजूला एका हातगाड्यांवरून शहाळ्याची विक्री करून वाहतूक आणि सामान्य नागरिकांना अडचण निर्माण केल्याप्रकरणी निसार मकबुल बल्लारी (53, रा. ताळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.