नवे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
15

राज्याचे नवीन पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी आपल्या पदाचा ताबा काल स्वीकारला. केंद्र सरकारने आसगाव येथील घराची मोडतोड प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांची नवी दिल्ली येथे बदली केली होती. तसेच नवीन पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची नियुक्ती केली होती. त्यांचे रविवारी गोव्यात आगमन झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी आपल्या पदाचा ताबा स्वीकारून कामकाजाला सुरूवात केली.