नवीन संसद भवनाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

0
158

नवीन संसद भवनाची निर्मिती हा आज १३० कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी अत्यंत सौभाग्याचा व गर्वाचा दिवस आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत आहोत. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारे असेल. लोकशाहीमध्ये संवाद असायला हवा. वैचारिक भिन्नता प्रत्येक ठिकाणी असते परंतु संवादाची साखळी तुटू नये. जनतेच्या सेवेत कोणताही मतभेद असता कामा नये.

इथे पोहचलेली प्रत्येक व्यक्ती यासाठी जबाबदार आहे. आमच्या निर्णयामध्ये राष्ट्रीय हित सर्वतोपरी आहे’ असे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काल दिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानंतर ते बोलत होते. मंत्रोच्चारासह हा भूमिपूजन सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी यावेळी उपस्थिती होते. नवीन संसद भवनासाठी ९७१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला असून ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे या भवनाच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. या भवनाची इमारत चार मजली असणार आहे.