नवीन वाहतूक नियमांबाबत निर्णय डिसेंबर अखेरीस

0
125

राज्यात नवीन वाहतूक नियमांची अंमलबजावणी आत्ताच्या घडीला शक्य नाही. राज्यातील रस्त्यावरील खड्‌ड्यांची दुरुस्ती व नवीन वाहतूक नियमाबाबत जनजागृतीला प्राधान्य दिले जाणार आहे. डिसेंबरच्या अखेरीस फेरआढावा बैठक घेऊन वाहतूक नियम अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

राज्यात नवीन वाहतूक नियमाची अंमलबजावणीबाबत वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. आता, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वक्तव्यानंतर नवीन वाहतूक नियमांची अंमलबजाणी साधारण नवीन वर्षात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी वाहतूक खात्याच्या अधिकार्‍याची बैठक घेऊन नवीन नियम अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या कार्यकाळातील सरकारचे शंभर दिवस पूर्ण केले आहे. देशालाच्या विकासाला चालना देणारे अनेक निर्णय या शंभर दिवसाच्या काळात घेण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश निश्‍चित महासत्ता बनले, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जारी केलेल्या संदेशात काल म्हटले आहे.

’जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणं, तीन तलाक प्रथा बंद करणं, चंद्रयान-२ मोहिमेला पाठबळ देणे ही सरकारची महत्त्वाची कामगिरी आहे. मोदी सरकारने समान वेतन, लहान व्यापारी आणि शेतकर्‍यांना पेन्शन देण्याच्या योजनेसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. आयुष्मान भारत, उज्वला गॅस योजनेची व्याप्ती वाढवली, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.