नवीन पटनायक यांचा राजीनामा

0
3

नवीन पटनायक यांनी काल ओडिशाच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. भुवनेश्वर येथील राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपाल रघुवर दास यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पटनायक गेली 24 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. मंगळवारी लोकसभा निवडणुकीसोबतच ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकालही आले. दोन्ही राज्यात विद्यमान सरकारांची सत्ता गेली. ओडिशात भाजपला 147 पैकी 78 जागा मिळाल्या, तर बीजेडीला 51 जागा मिळाल्या. राज्यात प्रथमच भाजप एकट्याने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. भाजपने अद्याप मुख्यमंत्र्यांची घोषणा केलेली नाही. दरम्यान, बीजेडी 2000 पासून ओडिशात सतत सत्तेत आहे. बीजेडी अध्यक्ष नवीन पटनायक 24 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. 5 मार्च 2000 रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हापासून 2019 पर्यंत ते 5 वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री राहिले आहेत.