पाकिस्तानमधील राजकीय तिढा कायम असून काल पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुप्रीम कोर्टात खेचण्याचा इाशारा दिला. निदर्शक व लष्कर यांच्यासंदर्भात नवाज शरीफ संसदेत खोटारडेपणा करत असल्याप्रकरणी तसेच त्यांना अपात्र ठरविण्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टात खेचणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोलण्याच्या अनेक फेर्या होऊनही पाकिस्तानमधील विद्यमान राजकीय गुंता सुटलेला नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून तीव्र निदर्शने करणार्या निदर्शकांना नवाज शरीफ यांची पंतप्रधानापदावरून गच्छंती झालेली हवी आहे.