नववी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात

0
134

>> शिक्षण मंडळाकडून परिपत्रक जारी

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी ९ वी ते १२ वी पर्यंत अभ्यासक्रमात २८ ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी यासंबंधीचे एक परिपत्रक काल जारी केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा डोळ्यासमोर ठेवून सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित अभ्यासक्रमात कपात केली जाणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण संस्था प्रमुख, पालक यांच्यात अभ्यासक्रमाबाबतची असलेली चिंता दूर करण्यासाठी शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम अधिसूचित केला जात आहे. बारावीच्या मार्च २०२१ च्या परीक्षेसाठी प्रॅक्टीकल विषयांची प्रश्‍नपत्रिका ५५ गुणांऐवजी ७० गुणांची (अडीच तास) राहील. संबंधितांकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर सरकारशी सल्लामसलत करून अभ्यासक्रमाबाबत अंतिम परिपत्रक जारी केले जाणार आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.