नववर्ष व पर्यटन हंगाम याच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येण्याच्या वाटेवर असतानाच राज्यात अमलीपदार्थांचा व्यवहारही वाढला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने मरड-म्हापसा येथे छापा टाकून काल डोंगरी-वास्को येथील शाम चव्हाण या युवकाला अटक करत त्याच्याकडून 4 किलो एवढा गांजा जप्त केला असून, त्याची किंमत 4 लाख रुपये एवढी आहे.
दुसऱ्या एका घटनेत धनवाडा-साळगाव येथे दिनेश रुपचंद कुमार (रा. हिमाचल प्रदेश) या युवकाला अटक करुन त्याच्याकडून 2.80 लाख रुपयांचा 280 ग्रॅम चरस जप्त केला.