नवयुगाचे कृष्णार्जुन

0
22
  • – प्रा. रमेश सप्रे

आपल्याला एखाद्या ध्येयाबद्दल तळमळ मात्र हवी. अतिशय उत्कटतेनं जर आपण एखादं स्वप्न पाहिलं नि ते साकार करण्यासाठी काया-वाचे-मने सतत प्रयत्नशील असलो तर आपल्याला आतूनच मार्गदर्शन, स्फूर्ती मिळू लागते.

‘दोनशे वर्षांनी पुन्हा वायव्येकडे येईन’ हे उद्गार नरेंद्रचे गुरुदेव रामकृष्णांचे- १८८६ साली काढलेले. म्हणजे एकशे तीस वर्षं झालीसुद्धा. अजून सत्तर वर्षांनी रामकृष्ण पुन्हा अवतरणार. आपण त्यावेळी असू-नसू-कुठं असू? -कशाला असा विचार करायचा? अवतारी पुरुषांनाही अवतारकार्य करायला सहकार्‍यांची आवश्यकता असते. पुराणग्रंथात याचं प्रतीकात्मक वर्णन केलेलं असतं. श्रीराम, श्रीकृष्ण यांना असुरनाश व सज्जनरक्षण या कार्यासाठी ज्या सहकार्‍यांची आवश्यकता होती तेही मुळात कुठले तरी देव-देवता होते. त्यांनी या महामानवांच्या अवतारकार्यात सहभागी होण्यासाठी जन्म घेतला होता. राम-कृष्ण हे जर विष्णूचे अवतार होते तर त्यांचे बंधू लक्ष्मण-बलराम हे देषाचे अवतार होते. या दोघांनीही राम-कृष्ण यांच्याबरोबर राहून त्यांची सेवा करण्यात धन्यता मानली जशी शेष नाग बनून भगवान विष्णूची सेवा करत असतो.

इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही वर्णनं बरीचशी प्रतीकात्मक असतात. सारी शक्तीची विविध रूपं असतात. ती शक्ती कार्य करत असते निरनिराळ्या प्रकारे नि वेगवेगळ्या माध्यमातून. यावर वाचन-मनन-चिंतन मात्र केलं पाहिजे. त्यातून आपल्या जीवनाला निश्‍चित दिशा व प्रेरणा मिळू शकते. नरेंद्रनंही या सर्व कथांवर चिंतन केलं होतं. पुढे विवेकानंद बनल्यावर लोकांच्या आग्रहावरून त्यानं रामायण, महाभारत, गौतम बुद्ध अशा विषयांवर व्याख्यानं दिली होती. भगवद्गीता, पतंजलींचे योगशास्त्र यांसारख्या ग्रंथांवर चिंतन करून अनेक ठिकाणी विचार मांडले होते.
रामकृष्णांचं आगमन पुन्हा होईल किंवा न होईल, आपण विवेकानंदांसारखे- निदान त्यांना हव्या असलेल्या पोलादी स्नायू व सिंहासारख्या धैर्यवान मनाचे युवक-युवती बनायला काय हरकत आहे? इथं ‘पोलादी स्नायू’ (मसल्स ऑफ स्टील) हे जिममध्ये जाऊनच फक्त कमवायच्या पिळदार शरीराचं (बॉडी बिल्डिंग) वर्णन नाही, तर मनाचा निर्धार, कठोर परिश्रमांची तयारी, कोणतीही अडचण ही समस्या (प्रॉब्लेम) न समजता आव्हान (चॅलेंज) मानून ते स्वीकारण्याची धडाडी यांनी घडलेली व्यक्तिमत्त्वं विवेकानंदांना हवी होती, ती तरी आपण घडवूया.
यासंदर्भात रामकृष्णांकडे येणार्‍या नरेंद्रासारख्याच एका तेजस्वी युवकाचं उदाहरण विचार करण्यासारखं आहे. त्याचं नाव सुबोधचंद्र, जो पुढे संन्यास घेतल्यावर स्वामी सुबोधानंद झाला. नरेंद्रपेक्षा वयानं लहान तर होताच, पण नरेंद्रानंतर पाच वर्षांनी रामकृष्णांकडे आकर्षित झाला. त्याला कारण घडलं त्याच्या वाचनात आलेली रामकृ