दैनिक नवप्रभाने काल आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. नवप्रभाचा ४९ वा वर्धापनदिन यानिमित्ताने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कर्मचारीवर्गातर्फे आयोजित श्रीसत्यनारायण महापूजेस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, विरोधी पक्षनेते श्री. दिगंबर कामत, सभापती श्री. राजेश पाटणेकर, पणजीचे महापौर उदय मडकईकर, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, माजी मंत्री महादेव नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांनी उपस्थिती लावून नवप्रभेला शुभेच्छा दिल्या.
नवप्रभेच्या वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थित राहणार्यांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता – मुख्यमंत्री – डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सभापती – राजेश पाटणेकर, पणजीचे महापौर उदय मडकईकर, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संजय वालावलकर, पतंजलीचे गोवा प्रभारी राकेश अगरवाल, डॉ. शेखर साळकर, राज्याच्या माहिती व प्रसिद्धी संचालक सौ. मेघना शेटगावकर, माहिती अधिकारी जॉन आगियार, पत्र सूचना कचेरीचे अधिकारी विनोदकुमार, अजयकुमार, गोपाल छेत्री, उद्योगपती यतीश धेंपे, माजी मंत्री महादेव नाईक, राजीव नाईक, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, उद्योजक मांगीरिश पै रायकर, नवहिंद टाइम्सचे संपादक अरुण सिन्हा, ज्योती कुंकळकर, संपदा कुंकळकर, उज्ज्वला तारकर, प्रवीण भोजराज, गोमंतक साहित्य सेवक संघाचे अध्यक्ष रमेश वंसकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, वृत्तपत्रलेखक महासंघाचे अध्यक्ष शशिकांत सरदेसाई, सचिव ऍड. सुभाष पुंडलिक सावंत, तुकाराम शेटगावकर, पत्रकार प्रेमानंद नाईक, शेखर वायंगणकर, ज्येष्ठ पत्रकार जयंत संभाजी, दैनिक नवप्रभाचे माजी संपादक श्री. सुरेश वाळवे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, ज्येष्ठ संगीतज्ज्ञ जनार्दन वेर्लेकर, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, दूरदर्शनचे माजी संचालक गुरुनाथ पै, माजी आमदार विनायक नाईक, प्रुडंट मीडियाचे संपादक प्रमोद आचार्य, लौकीक शिलकर, रामनाथ रायकर, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ, साहित्यिक शरत्चंद्र देशप्रभू, डॉ. राजीव कामत, सौ. कामत, ‘इन गोवा’चे संपादक अनिल लाड, पत्रकार केन्झील रॉड्रिगीस, गुरूनाथ नाईक, देविदास कांबळी, सुभाष गोविंद नाईक, साहित्यिक रघुनंदन केळकर, सौ. वैदेही केळकर, प्रदीप मसुरकर, अर्जुन शिरोडकर, विजयसिंह आजगावकर, रामकृष्ण कामत, श्याम धारगळकर, शर्मिला प्रभू, कृष्णा मंत्री, राजन कामत, विली डिसोझा, विश्वनाथ केणी, श्रीनिवास कामत शंखवाळकर, काशिनाथ पर्वतकर, प्राची प्रकाश कासार, कृष्णा तेली, पूजा तेली, सुदेश नाईक, विजय पार्सेकर देसाई, कवी प्रकाश तळवणेकर, निवृत्त बँक अधिकारी सतीश फडते, क्रांतिराज सम्राट, समाजकार्यकर्त्या अनुराधा गानू, संजय देवजी, सिलीमखान, विजय कळंगुटकर, विठ्ठल पार्सेकर, ऍड. प्रभाकर नार्वेकर, अरुण बिचोलकर, अवधूत आंगले, गणपत कुंडईकर, संदेश शहापूरकर, अवधूत शिरोडकर, मधुसूदन देसाई, महेंद्र देसाई, ऍड. योगेश गायतोंडे, भिवा परब, नारायण विणू नाईक, गितेश च्यारी, पत्रकार अजित पैंगीणकर, महेंद्र पागी, तुकाराम हळदणकर, देविदास कांबळी, नारायण देसाई, गौरीश नागवेकर, श्रीराम शेट्ये, उदय सावंत, नारायण कोरगावकर, गुरुनाथ नाईक, विश्वनाथ परब, सुधाकर नाईक, नीरज प्रभू, सोनिया सुभाष शाह, सुभाष शाह, राजेश मोरजकर, रमणदीप कौर, अमरीश परब, बी. टी. बोके, सतीश नार्वेकर, कृष्णा मांद्रेकर, संतोष मांद्रेकर, सौ. राजश्री कामत. ओजस रामचंद्र परब, मेहल रामचंद्र परब, रिद्धी पवार, भाग्यश्री कुलकर्णी, केदार कुलकर्णी.
श्री सत्यनारायण महापूजेचे यजमानपद रामचंद्र पांडुरंग परब व सौ. निशा रामचंद्र परब यांनी भूषविले.
डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या मुलांनी यावेळी मान्यवरांना रक्षाबंधन केले. त्यामध्ये विश्रृती देवजी, भावी सामंत, श्रीया शिरोडकर, अथर्व कोरगावकर, हंसिका गावकर यांनी भाग घेतला. शिक्षक भानुदास म्हाकले, व पालक शिक्षक संघाचे मनोहर कोरगावकर यांची यावेळी उपस्थिती होती.
वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने श्री नागेश महारुद्र महालक्ष्मी भजनी मंडळ, बांदोडा यांनी सुश्राव्य भजन सादर केले. त्यात विनयकुमार हेदे, आनंद बोरकर, सदानंद नाईक, सुहास नाईक यांनी भाग घेतला. दीपक पेंडसे (हार्मोनियम), पराग नागेशकर (तबला) यांनी साथसंगत केली.
ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, साहित्यिक सुरेश गुंडू आमोणकर, जयराम पांडुरंग कामत, अरुण जयराम कामत, सौ. पौर्णिमा केरकर, राजेंद्र केरकर, गौरी कुलकर्णी, मंगेश गुरव, वासुदेव कारंजकर, सौ. प्रतिभा कारंजकर, सौ. दीपा मिरिंगकर, सौ. माधुरी उसगावकर, साहित्यिक ज. अ. रेडकर, जयंती नायक, गोविंद काळे, महेश दिवेकर, गुरुदास नाटेकर, प्रशांत शेट्ये, संतोष शेट्ये, दामोदर आठल्येकर, अनुप प्रियोळकर, यतीन हेगडे देसाई, रूपेश गावस, ज्ञानेश मोघे, एडवर्ड डिलिमा, मारुती करमली, प्रल्हाद नाईक आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.