मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आदींसह असंख्यांची उपस्थिती
दैनिक नवप्रभाचा ४४ वा वर्धापनदिन काल उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार विष्णू सूर्या वाघ, रोहन खंवटे, प्रमोद सावंत, ग्लेन टिकलो आणि विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांनी याप्रसंगी आवर्जून उपस्थिती लावून नवप्रभेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी नवहिंद टाइम्सच्या अँड्रॉईड ऍपचे अनावरण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे.
उपस्थितांमध्ये उद्योगपती श्रीनिवास धेंपो, विश्वासराव धेंपो, सुभाष वेलिंगकर, भरतेश बोके, धर्मा चोडणकर, डॉ. शेखर साळकर, संजय हरमलकर, मंगलदास नाईक, भास्कर नारूलकर, किशोर नार्वेकर, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, दिलीप बोरकर, अमिता नायक सलत्री, ज्योती कुंकळकर, संपदा कुंकळकर, मृणालिनी सहस्त्रभोजने, सौ. अनुराधा गानू, श्री. गानू, ऍड. सुभाष पुंडलिक सावंत, केदार धुमे, डॉ. अजय वैद्य, दिलीप धारवाडकर, जनार्दन वेर्लेकर, लक्ष्मण पित्रे, सतीश फडते, श्री. सदाशिव सिंगबाळ, गुरूदास नाटेकर, शरत्चंद्र देशप्रभू, मांगीरिश पै रायकर, अनंत जोशी, विवेक नाईक, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खांडेपारकर, सुरेश वाळवे, पणजी दूरदर्शन केंद्राचे संचालक गुरूनाथ पै, ‘द हिंदू’ चे प्रकाश कामत, परवीश कामत व चि. अबीर, दैनिक हेराल्डचे संजय ढवळीकर, सुहास बेळेकर, दैनिक तरुण भारतचे अविनाश वेंगुर्लेकर, गोमन्तक टाइम्सचे विठ्ठलदास हेगडे, उदय म्हार्दोळकर, चेतन म्हार्दोळकर, शेखर वायंगणकर, संदेश प्रभुदेसाई, प्रशांती तळपणकर, सौ. शेट, गुरूदास सावळ, सतीश नाईक, जगदीश दुर्भाटकर, पांडुरंग गावकर, सागर जावडेकर, बाबुराव रेवणकर, प्रदीप नाईक, देविदास गाड, डॉ. प्रमोद पाठक, डॉ. राजीव कामत, डॉ. सीताकांत घाणेकर, डॉ. राजेंद्र साखरदांडे, गंगाराम मोरजकर, काजल चोडणकर, वीरजा कामत, प्रकाश देसाई, पांडुरंग फळदेसाई, उमेश केरकर, अजित मांद्रेकर, गुरूनाथ नाईक, साहित्यिक अवधूत कुडतरकर, सुमेधा कामत देसाई, दिलीप बोरकर, नारायण महाले, अरुण जयराम कामत, सौ. वर्षा कामत, ऋता कामत, नारायण विनू नाईक, विनायक बोटे, शीतल व सुरेश अमृते, सखाराम घाग, सुमिता मांद्रेकर व लिशा मांद्रेकर, उमेश नाईक व कुटुंबीय, गिरीश उसकईकर, गुरूदास नार्वेकर, आर. के. सिंग, दिनेश नाईक, चंद्रकांत पाटील, प्रशांती आजगावकर, गौरीश नाईक, शरण च्यारी, लक्ष्मीकांत नाईक, दिशा च्यारी, हेमा पर्वतकर, वेलोशा परेरा, महादेव मोरजकर, ममता फुलारी, स्फूर्ती कोठारे, तुकाराम शेटगावकर, विजय देसाई, प्रभाकर नाईक, केवल बारवणी व आरती बारवणी, गणपत कुंडईकर, शर्मिला प्रभू, श्री. मंत्री, उज्ज्वला नाईक, पूर्वा नाईक, रिया नाईक, श्री. केंकरे, अपूर्व विजय कापडी, संतोष गुरव आणि इतर अनेक वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांचा समावेश होता. मातोंड – वेंगुर्ला येथील स्वरगंध प्रासादिक भजन मंडळाचे सदस्य लाडोजी परब, अभिषेक सावंत, भूषण सावंत, सचिन सावंत, सुनील सावंत, दीपक मिस्त्री, पप्पू सावंत, मनीष तांबोसकर व अक्षय सरवणकर यांनी सुश्राव्य भजने व आरत्या सादर केल्या. कर्मचारी श्री. भिवाजी नाईक व सौ. भीमावती यांनी श्री सत्यनारायण महापूजेचे यजमानपद केले. श्री. प्रसाद यांनी पौरोहित्य केले. दैनिक नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, नवहिंद टाइम्सचे संपादक अरुण सिन्हा, व्यवस्थापक प्रमोद रेवणकर, श्री. विजय कळंगुटकर आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.